नाविण्यपूर्ण उपक्रम

* नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम :- 

* नाविण्य पूर्ण उपक्रमाची यादी डाउनलोड करण्यासाठी=====>

 येथे क्लिक करा  


*उपक्रम नं १.✍


उपक्रमाचे नांव :👉
🌿🍃भाजी घ्या ,फळ घ्या, फुलं घ्या💐🍋🍃🌿

कृती

👫 प्रथम सर्व विद्यार्थ्यांना गोल रिंगण करुन उभा करावे.

👬 एका विद्यार्थ्याला   भाजी घ्या ,फळ घ्या, फुलं घ्या असे म्हणत  गोल फिरत भाजीवाल्याची नक्कल करायला लावावी


👫भाजी किंवा फळ किंवा फुल यापैकी फिरत असताना कोणत्याही विद्यार्थ्यांच्या समोर जावुन तीन पैकी (भाजी घ्या /फळ घ्या/ फुलं घ्या)

म्हणायला लावा.
 उदा. भाजीवाला विकणारा म्हणाला फळ घ्या ! त्यावेळी ज्या विद्यार्थ्याच्या समोर आहे त्यानी लगेच कोणत्याही फळाचे नांव सांगावे.

👬जो मुलगा बरोबर उत्तर देईन त्याच्यासाठी टाळया वाजवाव्यात


👫*पुन्हा भाजीवाला दुसऱ्या विद्यार्थ्याच्या  समोर जावुन भाजी घ्या म्हणेन तेव्हा ज्या विद्यार्थ्यासमोर भाजी घ्या म्हणतो त्याच विद्यार्थ्याने  जर लगेच उत्तर दिले तर ठीक नाही तर तो भाजीवाला होईन.


👬 कोणतेही फळ पुन्हा विकता येणार नाही यांची काळजी घ्यावी.


👫ज्याला फळाचे नांव जलद सांगता येणार नाही तो विद्यार्थ्यी संधी घेवुन भाजी विकेन. म्हणजे तो विद्यार्थी भाजीवाला होइेन आणि जो

विद्यार्थ्यी  भाजी /फळ/फुल विकत होता तो त्याच्या जागेवर जावुन‍ थांबेन.

वरील प्रमाणे विद्यार्थ्याना भाजी घ्या ,फळ घ्या, फुलं घ्या असा वेगवेगळा सराव करावा.


✌🏼तीनवेळा भाजी विकुन झाल्यावर भाजी विकणारा विद्यार्थी अभिव्यक्ती सादर करेल..कोणतेही...


-शिक्षकांसाठी सुचना :-


✍🏼भाजी  ,फळ  ,फुलं  हे पुन्हा होणार नाही यांची काळजी घ्यावी.

उदा. फुल घ्या म्हणाल्यावर एकदा गुलाब हे उत्तर दिल्यास येणार नाह यांची काळजी घ्यावी.

🎓अशा प्रकारे फळाचे नांवे, फुलांची नांवे, भाज्याची नांवे पाठ होतील सर्व विद्यार्थ्याना भाजीवाला होता येईल.


*फायदे :-

✍🏼 हजर जबाबी पणा वाढेल नक्कल करणाराची कृती इतरापेक्षा वेगळी असणार त्यामुळे मनोरंजन होईन.

✍🏼 मनोरंजानात्मक खेळ व अभ्यास होईन आणि मुलांना खुपच गमत वाटेल.


✍🏼भाजीवाला फळ ,भाजी , फुलं घ्या यापैकी काय विचारणार यांची उत्सुकता वाढेल त्यामुळे मुले चुका करतील


✍🏼 मुलांचे अवधान टिकुन राहीन


✍🏼 फळाचे,फुलांची,भाजीची नावे  हसत खेळत पाठ होतील..



==================================

* उपक्रम नं. २

उपक्रमाचे नांव :- *इशारे इशारे*

*शिक्षकांसाठी उपक्रमपुर्व सुचना* -

१) शिक्षकाने सर्व प्रथम विरुध्दार्थी शब्दांच्या जोडयांची यादी करांवी
२) प्रत्येक विरुध्दार्थी शब्दाच्या चिटटया तयार कराव्यात.
3) त्या चिठया एका डब्‍यात जमेल त्यामध्ये एकत्र कराव्यात.
४) चिठया कशाच्या आहेत हे मुलांना कळु देवू नये.

*कृती

* प्रथम सर्व विद्यार्थ्यांना गोल रिंगण करुन उभा करावे.
* मुलांना शिक्षकांनी तयार केलेली एकच चिठठी उचलण्यास किंवा घेण्यास सांगावे .
* मुलांनी चिठठी घेतल्यावर कोणाला दिसणार नाही अशा पदध्दतीने हळुच वाचन करायला सांगावी.
*  मुले चिठठीचे वाचन करतील. आणि चिठठी वरील शब्द लक्षात ठेवतील.शब्द कोणालाही सांगणार नाहीत यांची दक्षता घ्यावी.
* सर्वानी चिठठीचे वाचन केले का यांची विचारणा करावी. ज्यांना वाचता येणार नाही त्यांना मदत घेण्यांची सुचना करावी.
* शिक्षकांनी लगेच सुचना द्यावी कि, मी म्हणेन *आजx उद्या* त्याच मुलांनी कोणाला न सांगता इशारे करावेत.
*  एक मुलगा गोल रिंगणामध्ये उभा करावा..ज्याच्यावर संधी आहे तो मुलगा ( राज )

(अधिक माहितीसाठी लिंकवरुन फोटोसह माहिती घ्या.)

* रिंगणात उभा केलेला मुलगा पुर्ण गोल मध्ये कोण कोण *इशारे* करीत आहे हे पाहीन.
* ज्या मुलाकडे आज व उद्या हया चिठया आल्या आहेत त्या मुलांनी आत्ता संधी घेणाऱ्या मुलाला चुकवून जागा बदलायची (आदलाबदल करावी)आहे.उदा. ज्याच्याकडे*आज* चिठठी आहे तो *उदया* चिठठी असलेले मुलांच्या जागेवर जाण्याचा प्रयत्न करेन.
* जागा अदला बदल करताना संधी घेणाऱ्या मुलांनी आज आणि उद्याच्या जागा धरण्याचा प्रयत्न करावा.
* जो जागा धरण्यास किंवा जागेवर लवकर जाईन त्याची ती जागा होईन.
* त्याला जागा  मिळणार नाही तो पुन्हा संधी घेईन.
* पुन्हा शिक्षकांनी स्वत:च्या चिठठीतील विरुध्दार्थी शब्दांची जोडीचे नांवे घ्यावेत.... पुन्हा वरील प्रमाणे खेळ चालु राहील.

अशा प्रकारे *इशारे इशारे* खेळ घेता येईल.यामध्ये अशा प्रकारे विविध शब्दांच्या,अंकाच्या,इंग्रजी Rhyming Words, किंवा समानार्थी,मुळाक्षरे व बाराखडी (१ली व २री साठी) जोडया घेता येईल. *इशारे इशारे *



फायदे :-
1) मुलांना शाळेविषयी आवड निर्माण होईन.
२) विविध शब्द लक्षात राहतील.
३) आनंदी वातावरणातून खेळ व अध्यापन होईन.
४) शारीरीक, मानसिक,बौध्दीक खेळामुळे मुलांचे आनंदी वातावरणात शिक्षण होईन..
५) उत्सुकता निर्माण होईन पुढे कोणता शब्द......

एकवेळ हा खेळ घ्यावाच म्हणजे शिकणा-याला व शिकवणा-याला मिळणारा आनंद खुपच मोठा असणार आहे.
चला तर मग खेळुया *इशारे इशारे*
=====================================

उपक्रम क्र. ३) अभिव्यक्ती :-

दररोज परिपाठ झाल्याबरोबर आल्या आल्या वर्गात एक शब्द लिहावा व मुलांना त्या शब्दाविषयी जास्तित जास्त वाक्य लिहिण्यास सांगावेत.
फायदे:-
*सरावामुळे मुले वाक्ये लिहू शकतील.
*लेखनाचाही सराव होईल.
*अभिव्यक्तिलाही वाव मिळेल.
=============================

उपक्रम क्र. ४) जो दिनांक तो पाढा :-

मुलांना पाढे खुप कंटाळवाणे व कठिण वाटतात त्यामुळे परिपाठाचे वेळी रोज हा उपक्रम घ्यावा.परिपाठाचे दिवशी जी तारिख असेल तो पाढा विद्यार्थ्यांना म्हणायला सांगावे उदा.दिनांक ९ असेल तर ९चा पाढा म्हणायला सांगावे.
यामुळे प्रत्येक दिवशी वेगळा पाढा घेतल्याने अनेक दिवस व  महिन्यांच्या सरावाने विद्यार्थ्यांचे  पाठ होईल होईल.
हेच पाढे विविध गितांच्या चाली लावून सादरीकरण केल्यास विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होऊन प्रतिसादही चांगला मिळेल.

===========================

५) नविन इंग्रजी शब्द:-

परिपाठात दररोज दोन इंग्रजी शब्द सांगावेत व वंदेमातरमच्या वेळेस तेच शब्द विचारावेत व बरोबर उत्तर देणा-या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करावे.
यामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढेल व इंग्रजी विषयाबद्दल आवड निर्माण होईल.

==============================

६) मुलाखत :-

दर आठवड्यात एका विद्यार्थ्यांची मुलाखत घ्यावी.मुलाखतीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल.
साध्या व सोप्या प्रश्नाने सुरुवात केल्यानंतर मग अभ्यासक्रमातिल प्रश्न विचारावेत.विद्यार्थी फटाफट उत्तरे देतात.
काही दिवसानंतर विद्यार्थ्यांना एकमेकांची मुलाखत घ्यायला लावावी.
म्हणजे भविष्यातील बातमीदार,पत्रकार याची पायाभरणी होईल.
अभ्यासाचा सराव घेण्यासही अतिशय उपयुक्त उपक्रम आहे.

===============================

७) गाण्यातून शिक्षण :-

कला विषयासाठी आपण बडबड गिते ,विविध प्रकारची अनेक उपयुक्त गिते घेतो.त्यातीलच जोडशब्द मुलांना लिहायला सांगितल्यास मुले आवडिने लिहितात.
यातून वाचन-लेखन प्रकल्प लवकरच यशश्वी होतो.

==============================

८) हसत खेळत:-

हा उपक्रम टि.व्हि.वरील चालता बोलता कार्यक्रमासारखाच आहे.
मुलांना प्रश्न विचारावेत पहिल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर देणा-यालाच दुसरा प्रश्न विचारावा व त्याही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिल्यास तिसराही प्रश्न त्यालाच विचारावा व तिनही प्रश्नांची अचूक उत्तरे देना-या विद्यार्थ्याला एक चॉकलेट बक्षिस म्हणून द्यावे.यामुळे मुलांचा अभ्यासही होईल व सामान्य ज्ञानातही भर पडेल.

=============================



No comments:

Post a Comment