ओनलाईन पासपोर्ट/ पारपत्र

पासपोर्ट/ पारपत्र

पासपोर्ट अर्थात पारपत्र म्हणजे आपल्या देशातून बाहेर (अन्य कुठल्याही देशात) जाण्यासाठी सरकारकडून मिळालेली रितसर परवानगी. ही परवानगी काही अटींवर मिळते. यासाठी भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्याकडे अर्ज करावा लागतो. सर्व मोठ्या शहरांमध्ये पासपोर्ट कार्यालये असतात.कोणत्याही भारतीय नागरिकास पासपोर्ट मिळतो.शैक्षणिक संशोधन , फिरण्याची आवड असल्यास किंवा कामानिमित्त परदेशी जावे लागल्यास पारपत्र म्हणजेच पासपोर्ट काढणे गरजेचे आहे. पण पारपत्र काढण्यासाठी पासपोर्ट कार्यालयात सारखे खेटे मारावे लागतात, असा काही जणांचा समज असतो. तो समज चुकीचा आहे. आता तुम्ही ऑनलाइन पासपोर्टही काढू शकता.    यासाठी तुम्हाला  http://passportindia.gov.in/AppOnlineProject/online/procEFormSub या संकेतस्थळावर जावे लागेल. तेथे प्रथम दिलेली सर्व माहिती भरून रजिस्टर करावे लागेल.    तुमचा लॉग-इन आयडी तयार होईल. तो तयार करून नवीन पासपोर्ट काढण्यासाठीच्या लिंकवर (अप्लाय फॉर न्यू पासपोर्ट) क्लिक करा. जर तुम्ही पूर्वी पासपोर्ट काढला असेल तर (री-इश्यू ऑफ पासपोर्ट) या लिंकवर क्लिक करा.    दिलेल्या अर्जामध्ये आवश्यकता असेली माहिती भरा आणि अर्ज ‘सबमिट’ करा.    त्यानंतर पे अ‍ॅण्ड शेडय़ूल अपॉइंटमेंटवर क्लिक करा. त्यावर व्हिव्ह सेव्ह्ड/ सबमिटेड अ‍ॅप्लिकेशनवर क्लिक करा.    पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाइन पेमेंट सेवा अनिवार्य केली आहे.    तुम्ही क्रेडिट अथवा डेबिट कार्डने ऑनलाइन पेमेंट करू शकता. इंटरनेट बँकिंगद्वारेही तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता.    प्रिंट अ‍ॅप्लिकेशन रिसिप्ट या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर अ‍ॅप्लिकेशन रेफरन्स क्रमांक असलेली पावती छापून येईल.    पासपोर्ट कार्यालयाला तुम्ही आवश्यक कागदपत्रे आणि वरील नमूद केलेल्या पावतीसह ठरलेल्या दिवशी आणि वेळी भेटू शकता.    ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन जनरेट केल्यावर ९० दिवसांच्या आत तुम्हाला पासपोर्ट कार्यालयाला भेट द्यावी लागेल.    पुढील माहिती तुम्हाला पासपोर्ट कार्यालयात मिळेल.    पासपोर्ट मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –पासपोर्ट साइज फोटोग्राफ- ४ प्रतीरेशनकार्ड (तीन झेरॉक्स प्रती, नोटरी अटेस्टेड)फोटो आयडेंटिटी- निवडणूक कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (तीन झेरॉक्स प्रती, नोटरी अटेस्टेड)जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला (तीन झेरॉक्स प्रती, नोटरी अटेस्टेड) लग्न झाले असल्यास महिलांच्या बाबतीत मॅरेज सर्टिफिकेट आणि जर लग्नात नाव बदलले असल्यास पासपोर्टच्या अर्जात दिलेल्याप्रमाणे अ‍ॅफिडेव्हिट (प्रतिज्ञापत्र) करून घ्यावे.
PASSPORTपारपत्र मिळण्यासाठी आवश्यककागदपत्रे -पासपोर्ट साईज फोटोग्राफ- ४ प्रतीरेशन कार्ड (तीन झेरॉक्स प्रती, नोटरी अटेस्टेड)फोटो आयडेंटिटी- निवडणूक कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (तीन झेरॉक्स प्रती, नोटरी अटेस्टेड)जन्म तारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला (तीन झेरॉक्स प्रती, नोटरी अटेस्टेड)लग्न झाले असल्यास महिलांच्या बाबतीत मॅरेज सर्टिफिकेट आणि जर लग्नात नाव बदलले असल्यास पासपोर्टच्या अर्जात दिलेल्या प्रमाणे अ‍ॅफेडेव्हिट (प्रतिज्ञापत्र) करून घ्यावे.पासपोर्टसाठी अर्ज पोस्टात किंवा पारपत्र ऑफिसात फक्त रु.१० ला मिळतात. यात सर्व माहिती असते. अर्ज भरतांना काळ्या शाईने भरावेत. अर्ज पहिल्या लिपीतच (Capital) सुवाच्च अक्षरात लिहावा. अर्जातील सर्व स्पेलिंग अगदी तंतोतंत जोडणार्‍या कागदपत्रांप्रमाणेच पाहिजे.उदा. जर शाळा सोडल्याच्या दाखल्यात NILIMA चे स्पेलिंग NILEEMA असेल तर तसेच NILEEMA लिहिले पाहिजे. सर्व अर्ज स्वच्छ अक्षरात भरावा.सर्व अर्ज पूर्ण भरून पारपत्र कार्यालयात दोन प्रतीत सादर करून त्याची पावती घ्यावी. ही पावती पारपत्र घरी येईपर्यंत जपून ठेवावी. या पावतीवरील नंबरप्रमाणेच पुढील सर्व व्यवहार होतात.पासपोर्ट साठी लागणारे शुल्क- साधे- १०००/-  तात्काळ-१५००/पासपोर्ट मिळण्यासाठी साधारण ४५ दिवस, तर तात्काळ पारपत्र सात दिवसात मिळते.पासपोर्टबद्धलच्या सर्व प्रक्रियेची माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते.पारपत्रासाठी अर्ज जमा केल्यानंतर पुढील पायरी म्हणजे पोलिस चौकशी. अर्ज जमा केल्यानंतर हा अर्ज साधारण १५ दिवसांपर्यंत आपल्या भागातल्या स्थानिक पोलिस ठाण्यात चौकशीसाठी येतो. पोलिस फोन करून घरी चौकशीला येतात. मात्र त्यांच्या येण्याच्या भरवशावर न रहाता आपणच  इंटरनेटवर पाहून पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी करावी. पोलिस चौकशीच्या वेळेस पुन्हा सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि दोन फोटो (म्हणून प्रथमच जास्त फोटो काढून ठेवावेत) द्यावे लागतात. इथेही एक फॉर्म भरावा लागतो.काही कारणास्तव पोलिस चौकशीला घरी येतील तेव्हा आपण या वेळेस जर घरी हजर नसू आणि अर्ज पोलिसांनी परत पाठविला तर पुन्हा पासपोर्ट कार्यालयात जाऊन एक अर्ज भरावा लागतो म्हणजे पुन्हा हा अर्ज पोलिस चौकशीला येतो.पोलिस चौकशीत साधारणपणे खालील प्रश्न विचारले जातात            आपण या ठिकाणी किती दिवसांपासून राहता?            हे घर स्वतःचे आहे की भाड्याचे आहे?            घरी कोण कोण असते?            आपले शिक्षण किती झाले आहे?             तुम्ही कुठे जाणार आहात?सर्व प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक द्यावीत. साधारण आठ ते दहा दिवसात अर्ज पोलिसांच्या शिफारशीने पासपोर्ट कार्यालयात परत जातो. पोलिसांनी प्रमाणपत्र दिल्यानंतर पासपोर्ट पोस्टाने घरी येतो. आल्यावर सर्व नीट तपासून पाहावे. नावातील spelling नीट तपासून पाहावे. काही चूक असल्यास ताबडतोब पासपोर्ट कार्यालयाला कळवावे. नाहीतर प्रवासात याचा त्रास होतो.अधिक माहिती व फॉर्मसाठी येथे क्लिक करा… http://passport.gov.in/परदेशात जाऊन पुन्हा भारतात येइपर्यंत येणारे महत्वाचे टप्पेपासपोर्टसाठी अर्ज भरणे. त्यानंतर पोलिस चौकशी, पुढे टपालाने पासपोर्ट घरी येणेव्हिसा- अर्ज कोठे करावा- त्याची फी काय? ती कोठे भरावी? त्या त्या देशाच्या वकिलातीमध्ये मुलाखतीला जावे लागते. तेव्हा तेथे काय आक्षेपार्ह असते. कोणती कागदपत्रे लागतात. ती किती दिवस आधी द्यावीत. तेथे संभाव्य कोणकोणते प्रश्न विचारतात. त्यावेळेस काय उत्तरे द्यावीत. पुन्हा पासपोर्ट कुरीयरने येतो तेव्हा काय करावे. कधी कधी परत जातो, त्यावेळेस काय करावे.हेल्थ इंश्युरंस(आरोग्य विमा) घ्यावा काय, त्याबद्धल माहिती.विमान तिकीट- प्रवासासाठी चांगली एअर लाइंस कोणती,तिकीट कमी दर असलेले कसे शोधावे,वगैरे.परदेशी जाताना प्रत्येक एअर लाइंसचे नियम वेगवेगळे असतात ते कसे पहावेत. त्याची काय काळजी घ्यावी.किती बॅगा असाव्यात, सामान कसे भरावे, किती भरावे, वजन कसे करावे, हातातल्या बॅगेत काय सामान घ्यावे, लहान लहान गोष्टी अशा पहाव्यात.विमान तळावर जाण्यासाठी किती वेळ आधी निघावे, किती वेळा आधी पोहोचावे.विमानतळावर-बॅगा चेक करणॆ, बॅगांचे वजन बघणे, त्या कार्गोमध्ये देणॆ, इमिग्रेशन फॉर्म भरणॆ, तो ऑफीसर विचारणारी संभाव्य प्रश्ने, कस्टम क्लिअर करणॆ, बोर्डिंग पास घेणे, विमानात बसतांना पुन्हा चेकिंग, विमानात बसल्यावर काय काळजी घ्यावी, विमानात कोणकोणते फायदे करून घ्यावेत हे माहित नसते, विमान बदलण्याचे असेल तर कोणती काळजी घ्यावी, दुसर्‍या एअर पोर्टवर गेट कसे बदलावे, नवीन विमान बदलताना काय करावे, विमानात डिक्लेरेशन फॉर्म देतात तो कस भरावा.परदेशातील एअरपोर्टवर- इमिग्रेशन चेक करणे, सामान घेणे, सामान घेऊन कस्टम क्लिअर करणे, इथे जर बॅगा उघडायला लावल्या तर काय करावे, इथे भाषा येत नाही तेव्हा काय करावे, बाहेर कसे पडावे, समजा आपल्या माणसांची चुकामूक झाली तर काय करावे.    महत्त्वाचे-            पासपोर्ट सांभाळावा            विमान तिकीट सांभाळावे            सोबतच्या माणसापासून दूर जाऊ नये            सरकारी अधिकार्‍याशिवाय इतरांना पासपोर्ट दाखवू नये            शक्यतो कोणालाही आपला पत्ता देऊ नये            फक्त अधिकृत माणसाकडेच चौकशी करावी,त्यांना अडचण सांगावी            अनोळखी सामानास अजिबात हात लाऊ नये.            शक्यतो इंटरर्नॅशनल रोमिंगचे कार्ड घालून मोबाईल फोन जवळ ठेवावा.            आपली कागदपत्रे कोणालाही दाखवू नयेत.            विमानतळावर अधिकृत टॅक्सी बुक करता येते तेथूनच टॅक्सी ठरवावी.

No comments:

Post a Comment